Winter Session – 2022 | राज्यात लवकरच 4000 जागांसाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांची भरती – गिरीश महाजन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session – 2022) सुरू आहे. यावेळी वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली. वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राज्यात लवकरच डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या साडेचार हजार जागांसाठी पदभरती (Government Medical Job Recruitment) काढली जाणार आहे. सदर भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session – 2022) तिसऱ्या दिवशी वैद्यकीय मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आमच्या सरकारने एमपीएसच्या माध्यमातून 300 डॉक्टरांची भरती केली. सध्या राज्यात डॉक्टरांसाठी 28% पदे रिक्त आहेत. त्यासाठी आम्ही मेडीकल बोर्ड तयार करणार आहोत. आणि त्या बोर्डाच्या माध्यामातून लवकरच डॉक्टर आणि तज्ज्ञांची भरती केली जाईल. आत्तापर्यंत 10 टक्के रुग्णालये आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी केली जात होती. मात्र, आता हे प्रमाण आम्ही बदलत असून, 30 टक्के रुग्णालये आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी केली जातील.

तसेच आगामी काळात नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची मोठी संख्या लक्षात घेऊन जास्त व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यावर देखील आमचा भर आहे. वैष्णवी बागेश्वर या 17 वर्षीय तरुणीचा नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटीलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला होता. त्यावर देखील महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही त्यावर म्हैसेकर नावाच्या डॉक्टरांची एक समिती नेमली आहे. तसेच रुग्णालयाचे डीन यांना कार्यमुक्त केले आहे. तसेच या प्रकारातील आरोपींना पदावरून हटवले आहे, असे महाजन यांनी सांगितले. (Winter Session – 2022)

मेडिकल कॉलेज बाबत आम्ही लवकरच धोरणे ठरवणार आहोत.
अधिक मनुष्यबळासह सुसज्ज रुग्णालये आगामी काळात सुरू करण्यात येतील.
राज्यात 10 हजार खोल्या असलेले वसतीगृह मेडिकल विद्यार्थ्यांसाठी बांधण्याची गरज आहे.
त्यावर देखील आम्ही सीएसअरच्या माध्यमातून हा प्रश्न मांडत आहोत, असेही महाजन यांनी नमूद केले.

Web Title :- Winter Session – 2022 | maharashtra assembly winter session girish mahajan announced recruitment for 4500 doctor technician posts soon through

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus | जगात कोरोनाचा वाढता कहर, भारतात पुन्हा मास्क सक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या…

Devendra Fadnavis | पोर्नोग्राफिक विकृतीला ठेचण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प उभारणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Ambadas Danve | मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….