Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नावर जयंत पाटलांचे कर्नाटक सरकारला खडे बोल; म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन | राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) सध्या नागपूरात सुरू असून विविध मुद्यांवरून सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न विरोधक करताना दिसत आहेत. याचदरम्यान सभागृहाचे कामकाज सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला, आणि या प्रश्नावर कर्नाटक सरकारला त्यांनी खडे बोल सुनावत, विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी धारेवर धरले.

सीमावर्ती भागात मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे. तसेच जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे. याचा जाब कर्नाटक सरकारला विचारला पाहिजे तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला हवे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर जयंत पाटील यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला होता त्यावर ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘यांना जर जास्त मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका.’ अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारची कानउघडणी केली.

त्याचबरोबर त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा व्यक्त केली.
सोमवारी सीमाभागात मराठी बांधवांचे एक सम्मेलन भरवण्यात आले होते. या सम्मेलनामध्ये महाराष्ट्रातील एकही नेता पोहचणार नाही अशी व्यवस्था कर्नाटक सरकारने केली होती. माजी मंत्री हसनजी मुश्रीफ तेथे मराठी बांधवांच्या समर्थनार्थ तेथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर काठी उगारली गेली. आणि हे अत्यंत चुकीचे आहे.

मराठा एकीकरण समितीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आले होते.
तसेच शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात न येण्याचा सल्ला देण्यात आला होता.
त्यावर अरविंद सावंतांनी हे सर्व प्रकरण काल लोकसभेत देखील उपस्थित देखील केले होते.

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra assembly winter session ncp jayant patil on belgaon border row with karnataka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session 2022 | महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देण्याचे कारण काय? म्हणत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल…

Gram Panchayat Election Result-2022 | विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये ठाकरे गटाचे सरपंच

Thane ACB Trap | 3 हजाराची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच

Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण