Winter Session -2022 | ‘मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण…’, उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी दाखवला पेन ड्राईव्ह

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Winter Session -2022 | नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session -2022) सुरु आहे. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सीमावादावर (Maharashtra Karnataka Border Dispute) आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह यायला लागतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या निवेदनादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभागृहात (Winter Session -2022) पेनड्राईव्ह आणल्याचं सांगितलं. ते म्हणाले, विरोधीपक्षाने सीमावादाबाबत प्रस्ताव मांडला आहे. सभागृहातील सर्वांचं या विषयाबाबत एकमत आहे. जवळपास 56 वर्षांपासून हा लढा सुरु आहे. ज्यावेळी भाषावार प्रांत रचना झाली त्या आधीपासून सीमाभागात मराठी भाषा रुजलेली आहे. कित्येक वर्ष तिथे राहणारे नागरिक मराठी भाषा बोलतात. हा लढा राजकीय नाही. एक पेन ड्राईव्ह मी देणार आहे. 1970 च्या दशकात एक फिल्म सीमा भागातील नागरिकांवर केलेली आहे. 18 व्या शतकात त्याठिकाणी मराठी कशी वापरली जात होती. त्याचा उल्लेख आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा.

हा भाषावर प्रांत रचनेचा विष नसून माणुसकीचा हा विषय आहे.
इथ खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाट्या खाल्ल्या आहेत.
त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होतात, आता तुम्ही सीमा ओलांडली आहे.
मुख्यमंत्री दिल्लीला गेले. खरंतर हा विषय सुरु असताना दिल्ला जाणे योग्य आहे का?
मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? इथे आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी
पाट्या लागल्या पाहिजेत. तर काही जण कोर्टात गेले. मुळात आपलं सरकार कर्नाटक सरकारसारखी भूमिका
मांडणार आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Web Title :- Winter Session -2022 | uddhav thackeray speech vidhan parishad on maharashtra karnataka border dispute attack on eknath shinde devendra fadnavis produce pen drive karnataka cm basavaraj bommai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पत्नीच्या प्रियकराचा पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; संगमवाडी गावठाणातील घटना

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता रितेश देशमुखने केले असे काही स्पर्धक झाले थक्क

Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर