Winter Session | ‘त्यांना टोमणे मारण्याची सवय, फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाचा पलटवार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Winter Session | राज्याचं हिवाळी अधिवेश नागपूर येथे सुरु आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) हजेरी लावून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे यांना टोमणे मारण्याची सवयच आहे. त्यामुळे त्यांनी टोमणा मारला असावा. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं शिरसाट म्हणाले.

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?

उद्धव ठाकरे यांना टोमणे मारण्याची सवय असल्याने त्यांनी टोमणा मारला असावा. त्यांना फार गांभिर्याने घेण्याची गरज नाही. कारण ज्यावेळी बेळगाव सीमावाद (Belgaum Borderism) पेटला होता तेव्हा उद्धव ठाकरे कुठल्याही आंदोलनात सहभागी झाले नव्हते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे त्या आंदोलनात सहभागी झाले होते. बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) आणि भाजप (BJP) सीमावादाच्या ठराविरोधात नाही. मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने या ठरावाला विलंब झाला. आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल असे संजय शिरसाट यांनी सांगितले. (Winter Session)

आता तुम्ही सीमा ओलांडली

सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border Dispute) हा भाषावार प्रांत रचनेचा विषय नाही.
माणुसकीचा हा विषय आहे. खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत.
त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होता आता तुम्ही सीमा ओलांडली आहे,
असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. मुख्यमंत्री दिल्लीत गेले.
खरतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी
केलं काय? येथे आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत तर काही जण कोर्टात गेले.
मुळात आपलं सरकारं कर्नाटक सरकार (Government of Karnataka) सारखी भुमिका मांडणार आहे का?
असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Web Title :- Winter Session | winter session criticism of uddhav thackeray from shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Aging | वृद्धत्व येऊ शकते या डाएटमुळे, खाण्यापूर्वी जाणून घ्या अनेक प्रकारचे दुष्परिणाम

Maharashtra Karnataka Border Dispute | …तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, उद्धव ठाकरेंची अधिवेशनात मागणी