त्वचेच्या समस्या सोडविण्यासाठी ‘या’ सोप्या टीप्स वापरा, नक्की होईल फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात त्वचेची स्थिती खूप खराब होते. त्वचा कोरडी, निर्जीव होते. परंतु, आपण काही घरगुती उपाय करून या समस्येपासून आराम मिळवू शकता.

हिवाळ्यात नाक कोरडे होण्यास सुरुवात होते. बाहेरील थंडीमुळे आणि आतल्या उष्णतेमुळे नाकावरील त्वचा फाटण्यास सुरुवात होते. यासाठी आपल्याला आपली त्वचा सदैव मॉइश्चराइझ ठेवावी लागेल. दुधाच्या मलईमध्ये गुलाब पाणी मिसळून नाक आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावले तर ही समस्या दूर होते. आपण हाइड्रेटिंग मॉइश्चराइझ किंवा सेरामाइड्स क्रीम देखील लावू शकता.

– हिवाळ्यामध्ये कोंडा होणे सामान्य आहे. केसांसोबत भुव्यांवर देखील कोंडा पडतो. म्हणून भुवया स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रात्री फेसवॉश करताना भुवयावर लावून मालिश करून चांगले धुवा. हे मृत त्वचा काढून टाकेल. याशिवाय लिंबाचा रसदेखील फायदेशीर आहे.

– हिवाळ्यात हात पायांची त्वचादेखील फाटू लागते. वारंवार हात धुण्यामुळे ओलावा नाहीसा होतो. आपण प्रत्येक दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी संपूर्ण हात आणि पायावर मलई लावू शकता. ग्लिसरीन हँड क्रीम किंवा बदाम तेल लावू शकता.

– तसेच, अगदी गरम पाण्याने अंघोळ करू नका. कोमट पाण्याने अंघोळ करा. अंघोळ झाल्यावर शरीरावर क्रीम लावा.

– हिवाळ्यात ओठ फुटण्याची समस्या देखील होते. यासाठी आपल्या ओठांवर ग्लिसरीन असलेली क्रीम लावा. ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मॉइश्चरायझिंग तेलामध्ये साखर घाला आणि ओठांवर लावा. लोक हिवाळ्यात खूप कमी पाणी पितात हे देखील ओठ फोडण्याचे कारण असू शकते. हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी करू नका. सतत पाणी पीत राहा. त्यामुळे आपले ओठ गुलाबी राहतील.