हिवाळ्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर ‘या’ 5 गोष्टींचे सेवन करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामात फ्लू आणि विषाणूचा धोका अधिक वाढतो. यामुळे आपल्याला आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे महत्वाचे आहे. या हंगामामुळे बहुतेक लोक घरात राहतात. शारीरिक क्रिया होतात. ज्यामुळे बरेच लोक लठ्ठ होतात. या हंगामात अशा गोष्टींचे सेवन करणे अधिक चांगले आहे, जे केवळ रोग प्रतिकारशक्ती वाढवत नाही तर वजन देखील कमी करण्यास मदत करते. अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया

१) तूप

हिवाळ्यामध्ये गायीचे तूप सेवन केलेच पाहिजे. कारण यामुळे शरीर आतून उबदार राहते. यात अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात. मधुमेहातही तूप फायदेशीर आहे. याशिवाय तूप सेवन केल्यास वजन नियंत्रित करण्यास मदत होते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही.

२) भुईमूग

भुईमूग हे प्रथिने समृद्ध मानले जाते. हे कच्चे, पाण्यात वाफून किंवा भाजून देखील खाऊ शकतो. हे शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यात कमी कॅलरी असतात. जे वजन कमी करण्यास मदत करू शकते. या व्यतिरिक्त रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास प्रभावी असल्याचे मानले जाते.

३) हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या (पालक, मेथी, पुदीना, लसूण इत्यादी) प्रत्येक हंगामात फायदेशीर ठरतात, परंतु हिवाळ्यात त्याचे फायदे अधिक आहेत. यात अनेक पोषक घटक असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

४) हंगामी फळे

हिवाळ्यात सफरचंद, संत्री, नासपती आणि पपई यासारख्या हंगामी फळांचे सेवन फायदेशीर ठरते. ते केवळ रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासच मदत करत नाहीत तर वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात. सकाळ आणि संध्याकाळी स्नॅक म्हणून आपण ही फळे खाऊ शकता.

५) लसूण –

लसूण व्हिटॅमिन सी, बी ६, सेलेनियम आणि मॅंगनीज सारख्या खनिज पदार्थांचा चांगला स्रोत आहे. हे सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. याशिवाय लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बायोटिक गुणधर्म देखील आहेत, जे रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता बळकट करतात.

टीप –  हा सल्ला आपल्याला केवळ सामान्य माहिती म्हणून सांगण्यात आला आहे. काहीही घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

You might also like