मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात आता बऱ्याच ठिकाणी परतीच्या पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे तापमानात (Weather) घट झाली असून थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी (Winter) पडली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा (Winter) जोर चांगला वाढला आहे. पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur) आणि सातारा (Satara) या जिल्ह्यात थंडीमुळं (Cold Weather) हुडहुडी वाढली आहे.
राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 20 अंशांच्या खाली आले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशाच्या आसपास आहे. तर कमाल तापमान 30 ते 35 अंशांच्या आसपास आहे. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला तसेच दुसरीकडे चक्रीवादळ (Hurricane) देखील आलं. आता वारे उत्तर भारतातून वाहत आहे, त्यामुळं थंडी (Winter) मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
राज्यात सध्या नैर्ऋत्य मान्सूनने (Southwest Monsoon) विश्रांती घेतली आहे.
तर दुसरीकडं 29 ऑक्टोबरपासून ईशान्य मान्सूनला (Northeast Monsoon) सुरुवात होणार आहे.
हा पाऊस आंध्र प्रदेशपासून पुढे तामिळनाडूपर्यंत असतो.
हे वारे ईशान्येकडून येते त्यामुळं दक्षिण भारतात पाऊस पडतो.
हा पाऊस साधारण: डिसेंबर महिन्यापर्यंत असतो. त्यामुळं थंडीची लाट उत्तर कर्नाटक पर्यंत जाते.
यादरम्यान महाराष्ट्रातदेखील मोठ्या प्रमाणात थंडी पडते.
Web Title :- Winter | weather update news cold weather in maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Nitesh Rane | नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा, आ. नितेश राणेंची मागणी