संपूर्ण उत्तर भारतावर धूक्याची ‘चादर’, दिल्लीमध्ये आणखी ‘हूडहूडी’ भरवणार बर्फांची हवा, पावसाची देखील शक्यता

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संपूर्ण देश कडाक्याच्या थंडीने गोठून निघाला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि संपूर्ण उत्तर भारतात थंडीची स्थिती कायम असून शीतलहरी आणि धुक्याचे प्रमाणातही कोणतीही कमतरता नाही. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस या हिमवृष्टीचा प्रादुर्भाव राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये राहणार आहे, सोबतच इथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्येही हलका पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिमाचलमधील रोहतांग पर्वतांच्या काही ठिकाणी हलकी हिमवृष्टी झाली. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये येत्या 24 तासांत थंडीचे प्रमाण स्थिर राहील.

उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच इतर डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून अरुणाचल प्रदेश, पूर्व आसाम आणि नागालँडमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. योगायोगाने तामिळनाडू आणि लगतच्या राज्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, पर्वतात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे, दिल्लीतील थंडीचे प्रमाण कायम राहणार आहे. हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ होईल. तसेच , सकाळ आणि संध्याकाळी धुक्याचीही शक्यता असते. त्याच वेळी, डोंगरातून येणारे वायव्य वारे थंडी वाढविण्याचे काम करतील, दिल्लीत तापमान झपाट्याने खाली येऊ शकेल. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, येत्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/