‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘विप्रो समूह’ आणि ‘अझीम प्रेमजी फाऊंडेशन’कडून 1125 कोटींची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसमुळे वातावरण गंभीर बनत चालले आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाशी लढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. पोलीस आणि डॉक्टर्स, नर्स धोका पत्करून काम करीत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक गोष्टी देखील राज्याला सोडवाव्या लागत आहेत. एकीकडे राज्याचे उत्त्पन्न म्हणून येणारे कर थांबवण्यात आले आहेत. तर देशातील सरकारी वाहतूक व्यवस्था देखील बंद आहेत त्यामुळे राज्याला मोठी आर्थिक मदत मिळत असते.

देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. अशातच आता देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेली ‘विप्रो’ मदतीला धावून आली आहे. विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्राइजेज लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी एकत्रितपणे 1125 कोटी रुपयांची मदत केली आहे. देशात सुरु असलेल्या या महाभयंकर कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी एवढी मोठी रक्कम देऊ केली आहे. याबाबतची माहिती ए. एन. आय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

तेल, तूप, साबण अशा घरगुती वापराच्या वस्तूंच्या उत्पादनासह विप्रो म्हणजेच ; वेस्टर्न इंडिया प्रोडक्टस् हि कंपनी भारतात आय. टी क्षेत्रात देखील पुढे आहे. विप्रो व्यतिरिक्त रिलायन्स उद्योग समूह तसेच काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील कोरोनाच्या संकटकाळात मोठी भरीव आर्थिक मदत देऊ केली आहे.