‘कोरोना’च्या संकटादरम्यान ‘या’ कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! डिसेंबरपासून वाढेल पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेड उत्तम कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रमोशन देईल. कोविड – 19 साथीच्या काळात कंपनीचा व्यवसाय पूर्णपणे चालू ठेवण्यास आणि पुढे नेल्याबद्ल या कर्मचार्‍यांना कंपनीकडून ही भेट मिळेल. यापूर्वी कंपनीने म्हटले होते की, यावर्षी पगाराची वाढ अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. विप्रोने सध्याच्या साथीच्या दुष्परिणाम लक्षात घेता ही घोषणा केली.दरम्यान, यावेळी कंपनीने असेही सांगितले की, कॅम्पस जॉबच्या ऑफरचे ते टप्प्याटप्प्याने पालन करेल.

आता मंगळवारी विप्रो लिमिटेडच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, कोविड -19 सारख्या आव्हानात्मक वातावरणातही कर्मचार्‍यांनी दृढनिश्चय व कठोर परिश्रम घेतले आहेत जेणेकरुन व्यवसाय चालू राहू शकेल आणि उच्च स्टॅंडर्ड मेंटेन करू शकेल.

80 टक्के कर्मचार्‍यांना होईल फायदा

कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये असणाऱ्या या कंपनीने म्हटले की, “उच्च कामगिरी करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी B3 बँडमध्ये बढती देण्यात येईल. हे 1 डिसेंबरपासून लागू होईल. कंपनीच्या कर्मचार्‍यांपैकी सुमारे 80 टक्के कामगार B3 बँडमध्ये आहेत. जर आपण संख्या पाहिली तर या बँडमध्ये सुमारे 1,45,000 कर्मचारी आहेत. कंपनीच्या कर्मचार्‍यांची एकूण संख्या सुमारे 1,80,000 आहे.

विप्रोमधील 98 टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत

” Team Rainbow” कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या इंजिनिअरिंग कॅम्पसमधून निवडलेल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 1 डिसेंबर 2020 पासून वाढ करण्यात येणार आहे. आणि सध्या विप्रोमधील जवळपास 98 टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. दरम्यान, अलीकडेच कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी म्हणाले की, मला विश्वास आहे की, कल्चर निर्माण करण्यासाठी व नाविन्यास प्रोत्साहन देण्यासाठी कार्यालयात येणे आवश्यक आहे. प्रेमजी अलीकडेच एका कार्यक्रमात म्हणाले होते, ‘नजीकच्या काळात सर्व लोक घरून काम करतील असे मला दिसत नाही. कालांतराने प्रत्येकजण ऑफिसमध्ये कामावर येईल.