
Wipro PARI Signs An MoU With COEP | अद्ययावत उत्पादन आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र स्थापनकरण्यासाठी विप्रो पारीचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोबत सामंजस्य करार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रोबोटिक्स (Robotics), मेकॅट्रॉनिक सिस्टीम (Mechatronic Systems), प्रगत सेन्सरी सिस्टीम (Advanced Sensory Systems) आणि इंडस्ट्री ४.० सह स्मार्ट फॅक्टरी (Industry 4.0 Smart Factory) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम सोल्युशन्समध्ये (Automatic Manufacturing System Solution) जागतिक स्तरावर आघाडीवर असलेली कंपनी विप्रो पारी (Wipro Pari) आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे College Of Engineering Pune (COEP) यांच्यात अद्ययावत उत्पादन व ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र (Automation Technology Center) आणि रोबोटिक्स (Robotics) व ऑटोमेशन प्रयोगशाळा (Automation Laboratory) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) झाला. या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा (Wipro PARI Signs An MoU With COEP) मंगळवारी करण्यात आली. यावेळी विप्रो पारीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कुमार (Prateek Kumar), व्यवस्थापकीय संचालक रणजित दाते ( Ranjit Date), रवी गोगिया (Ravi Gogia), सीईओपीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रताप पवार (Pratap Pawar), संचालक डॉ . बी.बी. अहुजा (Doctor B.B. Ahuja) व विप्रो पारीचे व्यवस्थापनातील वरिष्ठ उपस्थित होते (Wipro PARI Signs An MoU With COEP).
या सामंजस्य करारांतर्गत,विप्रो पारी कंपनीसीओईपीच्या मॅन्युफॅक्चरिंग सायन्सेस इमारतीतील नवीन इमारतीचे प्रायोजकत्व करेल.ही इमारत दोनमजल्यांची असेल. त्यात तळमजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅब (Manufacturing Technology Lab), शैक्षणिक वर्ग (Academic Classes),संगणकप्रयोगशाळा (Computer Lab) असेल तर दोन्ही मजल्यांवर कार्यालये असतील. या इमारतीचे नाव “विप्रो पारीसेंटर फॉर अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी” (Wipro Paris Center for Advanced Manufacturing Technology) असे असणार आहे याव्यतिरिक्त, विप्रो पारीरोबोटिक्स (Wipro Parirobotics) आणि ऑटोमेशन ऍप्लिकेशन्सवर (Automation Applications) केंद्रित असलेल्या एकात्मिक उत्पादनप्रयोगशाळेच्या स्थापनेला समर्थन देईल. विप्रो पारी संस्थापक मंगेश काळे (Mangesh Kale) यांच्यासन्मानार्थ या प्रयोगशाळेला “मंगेश काळे रोबोटिक्स अँडऑटोमेशन लॅब” (Mangesh Kale Robotics AndAutomation Lab) असे नाव दिले जाईल. या केंद्राद्वारे, विप्रो पारी उत्पादन तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणाराअभ्यासक्रम आणि प्रयोगशाळा तयार करण्यात मदत करेल. प्रकल्प आणि कारखानाभेटीद्वारे प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यात सहभागी (Wipro PARI Signs An MoU With COEP ) होवू शकतील.
या सामंजस्य कराराबाबत विप्रोइन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कुमार म्हणाले की विद्यार्थ्यांना उत्पादन क्षेत्रात अग्रेसर म्हणून विकसितकरण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी (Educational Institution) उत्कृष्टता केंद्रेआणि प्रयोगशाळा स्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनापुरेशा संधी मिळतील. यासाठी सीओईपीसोबत भागीदारीकरताना आम्हाला आनंद होत आहे.
विप्रो पारीचे व्यवस्थापकीयसंचालक रणजित दाते म्हणाले की मी स्वतः सीओईपी चा माजीविद्यार्थी आहे.
आमच्या अभियांत्रिकी प्रतिभेला इतके आवश्यक ज्ञानदेण्यासाठी आणि
प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाला तरुण अभियंत्यांसाठी करिअरची निवडकरण्यात मदत करण्यासाठी आमच्या संस्थेशी भागीदारी केल्याचा मला अभिमान आहे.
सीओईपीच्या (COEP) प्रशासकीयमंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले.
की आम्ही उद्योग आणि इतरशैक्षणिक संस्थांच्या सहकार्यातून सीओईपीला नवीन उंचीवर नेत आहोत.
सीओईपीचे संचालक डॉ.बी. बी. आहुजा म्हणाले की वर्तमान, अत्याधुनिक आणिभविष्यकालीन अभ्यासक्रम,
सुविधा आणि संशोधनाची खात्री करण्यासाठी सीओईपी नेहमीउद्योगाशी सहयोग करण्यास उत्सुक आहे.
या सामंजस्य करारामुळे आम्हाला विप्रो पारी याक्षेत्रातील जागतिक कंपनी सोबत भागीदारीकरण्याची संधी मिळते.”
Web Title :- Wipro PARI Signs An MoU With COEP | wipro pari signs an mou with the college of engineering pune to establish a centre for advanced manufacturing automation technologies
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Peas For Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे मटार, जाणून घ्या 5 फायदे