दिवाळीच्या मुहूर्तावर ‘या’ कंपनीकडून ‘बंपर’ प्रोमोशन, 5000 कर्मचार्‍यांना मिळणार ‘फायदा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळीच्या आधीच IT कंपनी विप्रो (Wipro) च्या कर्मचाऱ्यांना एक गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. विप्रो येणाऱ्या तिमाहीत आपल्या 5,000 कर्मचाऱ्यांना प्रोमोट करण्याचे नियोजन करत आहे. एका अहवालानुसार कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कायम टिकवून ठेवण्यासाठी पावले उचलू इच्छित आहे. सप्टेंबर महिन्यात विप्रोमध्ये कर्मचारी टिकण्याचा दर 17 टक्के होता जो मागील तिमाहीत जवळपास 0.60 टक्क्यांनी कमी झाला आहे.

या कर्मचाऱ्यांचे होणार प्रमोशन
विप्रो एचआर हेड सौरभ गोविल यांच्या मते दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कर्मचारी जोडून राहण्याचा दर विप्रोमध्ये उत्तम आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना पगार वाढवून दिला आहे आणि आता प्रमोशन देणार आहे. 5 ते 8 वर्षांचा अनुभव असलेल्या जवळपास 5 हजार कर्मचाऱ्यांचे प्रमोशन देण्याची तयारी सुरु आहे.

फ्रेशर्सला देण्यात आला बोनस
पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने आपल्या फ्रेशर्सला 1 लाख रुपयांचे रिटेंशन बोनस दिला होता. ज्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून हायर करण्यात आले होते आणि कंपनीमध्ये 1 वर्ष पूर्ण केला आहे. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्यांना देखील बोनस देण्यात आला जे कंपनीमध्ये मागील 3 वर्षापासून काम करत आहेत.

कनिष्ठ कर्मचारी मोठ्या प्रमाणात बदलत आहेत नोकऱ्या
कंपनीने हे पाऊल यासाठी उचलेले आहे कारण मागील तिमाहीपासून आयटी क्षेत्रातून अनेक जूनियर कर्मचारी (कनिष्ठ) कंपन्या सोडत आहेत. यातील अनेक कर्मचारी उत्तम प्रदर्शन करणारे नव्हते. कारण त्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच उत्तम बोनस, इंसेंटिव आणि पगार मिळाला आहे.

कंपनी करत आहे भविष्याची तयारी
कंपनी प्रमोशनलमध्ये एल 1 कर्मचाऱ्यांना एल 2 आणि एल 2 कर्मचाऱ्यांना एल 3 मध्ये प्रमोट करण्यात येत आहे. आयटी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या स्तरांवर विभाजित करण्यात येते. ज्यात एल 1 मध्ये येणारे कर्मचारी सर्वात जूनियर लेवलचे. कंपनीच्या हेड एचआरच्या मते आम्ही तयार राहू इच्छितो कारण आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना तयार करु इच्छितो यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि रि स्किलिंग देण्यात येईल. आमच्या या निर्णयाचा परिणाम पुढील दोन ते तीन महिन्यात महसूलात झालेल्या वाढी वरुन दिसेल. आयटी कंपन्या सब कॉन्ट्रॅक्टरवरील आपली निर्भरता कमी करत आहे. या कंपन्या आपल्या कंपनीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू इच्छित आहे. कंपन्याच्या मते अमेरिकेत 68 टक्के कर्मचारी स्थानिक आहेत.

Visit  :Policenama.com

 

You might also like