विप्रोचे अजीम प्रेमजी होणार ‘रिटायर’ ; मुलगा रिशद संभाळणार विप्रोची ‘धुरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विप्रो या देशातील अत्याधुनिक आयटी कंपनीचे एक्जीक्युटीव चेअरमन अजीम प्रेमजी यांनी रिटायरमेंट घेणार असल्याचे जाहिर केले आहे. बीएसईला देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याचा कार्यकाळ 30 जुलै 2019 रोजी संपणार आहे. त्यानंतर आता विप्रोचे एक्जीक्युटीव चेअरमन त्यांचा मुलगा रिशद प्रेमजी असणार आहे.

अजीम प्रेमजी यांनी एकदा मत व्यक्त केले होते की, हा माझ्यासाठी अत्यंत लांब आणि संतोषपुर्ण प्रवास होता. जर भविष्याचा विचार केला तर मी माझा जास्तीत जास्त वेळ समाजसेवेसाठी कसा देता येईल यांची योजना आखली आहे. मला रिशद च्या नेतृत्ववर संपुर्ण विश्वास आहे. तो कंपनीला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.

विप्रोच्या समितीने सांगितले आहे की चीफ एक्जीक्युटीव ऑफिसर आणि एक्जीक्युटीव डायरेक्टर अबी दअली जेड नीमचवाला यांना कंपनीचे सीईओ आणि प्रबंध निर्देशक म्हणून नियुक्त करण्यात येईल. अजीम प्रेमजी यांचा कार्यकाळ अजून 30 जुलै पर्यंत असल्याने त्यानंतर हे सर्व अंमलात येईल. असे असले तरी शेअर होल्डर्स कडून यासाठीची मंजूरी अजूनही बाकी आहे.

कंपनीने अजीम प्रेमजी यांचे पुत्र रिशद प्रेमजी यांना पुढील 5 वर्षांसाठी पुर्णकाळासाठी निर्देशक आणि एक्जीक्युटीव चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे. यापुढे रिशद विप्रो समुहाची जबाबदारी संभाळतील. त्यांची नियुक्ती देखील 31 जुलैला होणार आहे.