धक्कादायक ! पोलिसांनी मुलांच्या डोळ्यांदेखत वडिलांना घातल्या 7 गोळ्या, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीसोबत पोलिसांच्या हिंसाचाराचे नवीन प्रकरण समोर आले आहे. रविवारी विस्कॉन्सिनच्या कॅनेशा शहरात दोन पोलिसांनी कृष्णवर्णीय जेकब ब्लेकवर मुलांसमोर गोळी झाडली. पोलिसांनी निवेदनात ब्लेक यांच्याकडे शस्त्र होती, त्यामुळे गोळ्या झाडल्या, असे सांगितले. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ब्लेककडे शस्त्र नसल्याचे दिसत आहे.

पोलिसांनी जेकबच्या पाठीवर 7 गोळ्या झाडल्या आहेत.

गोळ्या लागल्यानंतर जेकबला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची प्रकृती आता ठिक असून जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र पोलिसांच्या या कौर्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेकबचा वकील बेन क्रंपया यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे. एसयूव्हीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी जेकबवर गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. या प्रकरणानंतर संतप्त लोकांनी कॅनोशा कोर्टहाऊससमोर निदर्शने केली. निदर्शनं तीव्र झाल्यानंतर कॅनोशामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या दोन महिन्यांतील कृष्णवर्णीयांवर पोलिसांनी गोळीबार केल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 12 जून रोजी, जॉर्जियामधील अटलांटामध्ये अटकेच्या काही धिकार्‍यांनी 27 वर्षीय राशर्ड ब्रुक्सला गोळ्या घातल्या होत्या.