Witchcraft | लज्जास्पद ! जादूटोणाचा आरोप करत एकाच कुटुंबातील 7 लोकांना चौकात बांधून मारले, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

मुंबई : Witchcraft | महाराष्ट्र आणि तेलंगनाच्या सीमेवरील गाव वानी खुर्दमध्ये ग्रामस्थांनी जादूटोणा (Witchcraft) केल्याचा आरोप करत एकाच कुटुंबातील 7 लोकांना चौकात बांधले आणि नंतर अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. पीडितांमध्ये चार महिला आणि तीन ज्येष्ठांचा समावेश आहे.

घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 12 लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, पीडित व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मारहाणीत जबर जखमी झालेल्या 5 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.

ही भयंकर घटना समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून गावात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले की, या घटनेनंतर गावात शांतता आणि सुव्यवस्थेबाबत सरपंच आणि पोलीस दलाने बैठक घेतली आहे.

स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी गावात योग्य ते पोलीस बळ तैनात केले आहे. त्यांनी सांगितले की,
सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.

हे देखील वाचा

Delta Plus Variant | मुंबईत 128 नमून्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला, महाराष्ट्रात डेल्टा प्लसची 27 नवीन प्रकरणे

High Court | दाढी ठेवण्यावरील प्रतिबंधाविरूद्धचा अर्ज फेटाळला; HC ने म्हटले – ‘धर्मनिरपेक्ष असावी पोलीस दलाची प्रतिमा’

PM Kisan | पीएम किसानच्या नवीन यादीतून कोणा-कोणाचे नाव वगळले?, ‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या संपूर्ण गावाची यादी; जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Witchcraft | 7 members of a family tied and beaten on road for allegedly doing witchcraft in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update