Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 46254 नवे पॉझिटिव्ह तर 514 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार २५४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ५१४ रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे, याच कालावधीत ५३ हजार ३५७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ८३ लाख १३ हजार ८७७ वर पोहचली आहे. कोरोना संसर्गाचा वेग हळूहळू कमी होताना दिसत आहे.

देशातील एकूण ८३ लाख १३ हजार ८७७ करोनाबाधितांमध्ये ५ लाख ३३ हजार ७८७ अक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७६ लाख ५६ हजार ४७८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २३ हजार ६११ जणांच्या संख्येचा समावेश आहे.