धक्कादायक ! ‘कोरोना’ बळींच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी

पोलिसनामा ऑनलाईन – देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान वाढत असून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या 47 हजार 65 इतकी झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सीकोनंतर भारताचा क्रमांक लागतो. 13 दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावर पोहचला होता. दररोज होणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे भारत आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारताचा मृत्यूदर फक्त दोन आहे. तर यूकेचा मृत्यूदर 14.9 टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत 46 हजार 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत अमेरिका (1 लाख 68 हजार 219), ब्राझील (एक लाख 3 हजार 99), मेक्सिको (53 हजार 929) स्थानावर आहेत. देशात मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक 56 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.38 टक्क्यांवर पोहोचले आहे. 16 लाख 39 हजार 599 रुग्ण करोनामुक्त झाले असून 6 लाख 43 हजार 948 रुग्ण उपचाराधीन आहेत.