नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाला तब्बल ८ हजार पाहुण्यांची उपस्थिती

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या समारंभाला अनेक देशांच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे. समारंभात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. पण बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन या शपथविधी समारंभात सहभागी होणार नाहीत.

उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभात जवळपास ८ हजार पाहुणे सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या या ऐतिहासिक परिसरात आयोजित केलेले आतापर्यंतचे हे सगळ्यात मोठे आयोजन असेल. समारंभात भाग घेतलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला जाईल.

किर्गिजस्तान चे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोव आणि मॉरीशस चे पंतप्रधान प्रवीण कुमार जुगनुथ हे या समारंभाला उपस्थित असणार आहेत. शपथविधी समारंभ २०१४ च्या शपथविधी प्रमाणे राष्ट्रपती भवनाच्या फोरकोर्टमध्ये आयोजित केला जाईल. गेल्या वेळेसच्या शपथविधी समारंभात ५००० पाहुण्यांनी सहभाग घेतला होता.

You might also like