सततच्या ट्रोलिंगमुळं वैतागलेल्या कनिक कपूरनं केलं ‘हे’ काम ! पुन्हा आली चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड सिंगर कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. लंडनहून लखनऊला आल्यानंतर कनिकाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ती पॉझिटीव असल्याचं समोर आलं होतं. कनिकानं तिच्या इंस्टावरून याबाबत माहिती दिली होती.

रिपोर्टनुसार, 15 मार्च 2020 रोजी कनिका लंडनहून लखनऊला आली होती. एअर पोर्टवर तिनं वॉशरूमचं कारण सांगितलं आणि तिथून बाहेर पडली. तिच्या निष्काळजीपणामुळं उत्तर प्रदेशात तिच्या विरोधात 4 FIR दाखल करण्यात आल्या आहेत.

डिलीट केली इंस्टा पोस्ट

या सगळ्या नंतर आता सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कनिकानं आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तिनं तिची इंस्टा पोस्ट डिलीट केली आहे. ही तीच इंस्टा पोस्ट होती ज्यात तिनं कोरोनाबद्दल माहिती दिली होती. कनिका वारंवार ट्रोल होताना दिसत आहे. कदाचित ट्रोलिंगमुळंच तिनं ही पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

कनिकाची तिसरी टेस्टही पॉझिटीव

सिंगर कनिका कपूरची सलग तिसरी कोरोना व्हायरस टेस्ट करण्यात आली होती. यावेळीही कनिका पॉझिटीव असल्याचं आढळलं. समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी(दि 24 मार्च 2020) लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पुन्हा एकदा तिची कॉविड 19 टेस्ट करण्यात आली. ही तिची तिसरी टेस्ट होती. यात ती पुन्हा एकदा पॉझिटीव आढळली. याआधी रविवारी तिची दुसरी टेस्ट झाली होती. यातही ती पॉझिटीव आढळली होती.