15 ऑगस्टला भारताबरोबरच ‘हे’ 5 देश देखील साजरा करतात ‘स्वातंत्र्यदिन’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दोन दिवसांनंतर भारत आपला ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून संपूर्ण देशात यामुळे उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सर्वत्र कार्यक्रम साजरे केले जातील. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून आपल्याला ७२ वर्षे पूर्ण होतील पण या दिवशी केवळ भारतच स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करणार नसून भारताशिवाय जगभरात असे एकूण ५ देश आहेत ज्यांचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टला असतो. आपल्याला कदाचित माहित नसेल की साउथ कोरिया, नॉर्थ कोरिया, कांगो, बहरीन आणि लिकटेंस्टीन हेदेखील १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिन साजरा करतात.

१. दक्षिण कोरिया :
१५ ऑगस्ट १९४५ रोजी दक्षिण कोरियाला जपानकडून स्वातंत्र्य मिळाले. अमेरिकन आणि सोव्हिएत सैन्याने कोरियाला जपानपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे हा देश १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. दक्षिण कोरियामधील लोक हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरे करतात.

२. नॉर्थ कोरिया :
दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियाही १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या ताब्यातून दोन्ही देशांना मुक्त करण्यात आले होते. उत्तर कोरिया देखील १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करतो. सुट्टी असल्याने येथे यादिवशी लग्न करण्याची परंपरा सुरू झाली आहे.

३. बहरीन :
भरीन १५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटनमधून स्वातंत्र्य मिळवले. तथापि, १९६० च्या दशकापासून ब्रिटिश सैन्याने बहरीन सोडण्यास सुरवात केली. १५ ऑगस्ट रोजी बहरीन आणि ब्रिटन यांच्यात एक तह झाला, त्यानंतर बहरीनने स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनशी आपले संबंध प्रस्थापित केले. तथापि, १६ डिसेंबर रोजी बहरीनचा शासक ईसा बिन सलमान अल खलिफा याने बहरीनची गादी मिळविली असल्याने या दिवशी देशाने आपली राष्ट्रीय सुट्टी साजरी केली.

४.कॉंगो :
कॉंगोने देखील १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळविले. हा आफ्रिकन देश १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रान्सच्या तावडीतून मुक्त झाला. त्यानंतर ते कॉंगो रिपब्लिक बनले. १८८० पासून ८० वर्ष कॉंगो फ्रेंच देशाच्या ताब्यात होता. तेव्हा फ्रेंच कॉंगो म्हणून ओळखले जात असे.

५. लिकटेंस्टीन :
लिकटेंस्टीन या देशाने ने १५ ऑगस्ट १८६६ या दिवशी जर्मनी पासून स्वातंत्र्य मिळवले. १९४० पासून हा देश १५ ऑगस्ट ला आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा देश जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like