खुशखबर ! ५००० रुपयात घ्या पोस्ट ऑफिसची ‘फ्रेंचाइजी’, ८ वी पास देखील करु शकतात ‘अर्ज’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पोस्ट ऑफिसची डिमांड वाढत आहे. सध्या देशात १.५५ लाख पोस्ट ऑफिस आहेत. परंतू अजूनही असे अनेक ठिकाणं आहेत. जेथे पोस्ट ऑफिस नाहीत. पोस्टल डिपार्टमेंट पोस्ट ऑफिस सुरु करण्यासाठी लोकांना फ्रेंचाइजी देत आहेत. ज्या आधारे ते चांगली कमाई करु शकतात. तुम्ही देखील ही फ्रेंचाइजी घेऊ शकतात.

अशी घ्या फ्रेंचाइजी –

जर तुम्ही फ्रेंचाइजी घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला ५००० रुपये किमान सुरक्षित रक्कम (deposit) ठेवावे लागेल. फ्रेंचाइजीच्या आधारे तुम्ही ग्राहकांना स्टॅँप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी ऑर्डरची बुकिंग यासारख्या सुविधा देऊ शकतात. या सुविधा एका ठरलेल्या कमीशन बरोबरच फ्रेंचाइजी सुरु करणाऱ्याला कायम उत्पन्नचा आधार राहिलं.

८ वी पास सुरु करु शकतात फ्रेंचाइजी –

इंडिया पोस्ट फ्रेंचाइजी या योजनेचा लाभ कमी शिक्षण असलेले देखील घेऊ शकतात. कारण पोस्ट इंडियाने ही पात्रता ठेवली आहे. याशिवाय नव्या होणाऱ्या टाऊनशिप, स्पेशल इकोनॉमिक जोन, नवे सुरु होणारे इंडस्ट्रियल सेंटर, कॉलेज, विद्यापीठ असे देखील फ्रेंचाइजी सुरु करण्याचे काम करु शकतात. ही फ्रेंचाइजी सुरु करण्यासाठी अर्ज भरावा लागेल. निवड झालेल्या लोकांना डाक विभागाबरोबर MOU साइन करावा लागेल. या अर्जाची आधिक माहिती  https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf वरुन तुम्ही घेऊ शकतात. कोणीही व्यक्ती, इंस्टीट्युशस, ऑर्गेनाइजेशंस याशिवाय कॉर्नर शॉप, पानवाले, किरानामाल व्यापारी, स्टेशनरी शॉप इत्यादी लोक पोस्ट ऑफिस फेंचाइजी घेऊ शकत होते. यासाठी व्यक्तीचे वय १८ वर्ष असणे आवश्यक आहे.

अशी होईल कमाई –

फ्रेंचाइजीला मिळणारा कमाई पोस्टल सर्विसेस वर देण्यात येणाऱ्या कमीशनवर होईल. हे कमीशन किती असेल हे MOU मध्ये ठरवण्यात येईल.
रजिस्टर्ड आर्टिकल्सच्या बुकिंगवर – ३ रुपये
स्पीड पोस्ट – ५ रुपये
१०० ते २०० रुपये मनी ऑर्डरवर – ३.५० रुपये
२०० रुपयांपेक्षा आधिक मनी ऑर्डर – ५ रुपये
पोस्टज स्टॅप्म, पोस्टल स्टेशनरी, मनी ऑर्डर फॉर्म ची विक्रीवर रक्कमेच्या ५ टक्के
रेवेन्यू स्टांप, सेंट्रल रिक्रूटमेंटचे स्टांप्सच्या विक्रीवर रिटेल सर्विसेजवर पोस्टल डिपार्टमेंटला होणाऱ्या कमाईचा ४० टक्के

आरोग्यविषयक वृत्त –