‘कोरोना’बाधितांचा देशातील आकडा 40 लाखांच्या पुढं, ग्रामीण परिसरात संक्रमण पसरण्याच्या शंकेमुळं वाढला धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   देशात कोविड-19 च्या प्रकरणांनी 40 लाखांचा आकडा पार केल्यानंतर तो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरण्याबाबत चिंता वाढली आहे. कारण तेथे वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव आहे. मात्र, ही महामारी सुरूवातीला शहरी भागापुरतीच मर्यादित होती. तज्ज्ञांनी म्हटले की, ग्रामीण भागात कोरोना व्हायरस महामारी किती पसरली आहे, याचे अचूक आकडे नाहीत, परंतु देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचल्याचे येत असलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. तसेच तेथे सामाजिक स्तरावर सुद्धा संसर्ग पसरत आहे.

अवघे दोन आकडे संपूर्ण चित्र स्पष्ट करतात

भारताच्या 1.3 अरब लोकसंख्येचा 65 टक्के भाग गावांमध्ये आहे आणि ‘हाऊ इंडिया लिव्ज’ वेबसाइटनुसार देशात 714 जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामधून 94.76 टक्के लोकसंख्या धोक्याचा सामना करत आहे.

तज्ज्ञांच्या एका गटाने म्हटले आहे की, छोटी शहरे आणि परिसरांसोबत गावांमधून सुद्धा कोविड-19 ची प्रकरणे येण्याचे प्रमाण वाढले आहे. सीरो-सर्वेमध्ये हा खुलासा झाला आहे आहे की, महामारी देशाच्या बहुतांश भागात पसरली आहे, ज्यातून संकेत मिळतो की, कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रसार सामाजिक स्तरावर होत आहे.

कोविड-19 ची आतापर्यंत एकुण 40,23,179 प्रकरणे

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रीव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन तथा इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅपीडेमियोलॉजिस्ट्सने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे की, सहा महिन्यानंतर सुद्धा लोकांमध्ये सामजिक बदनामी, भिती आणि भेदभावाची भावना आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍याने सांगितले की, अर्ध-शहरी भागांतून जास्त संसर्गाची प्रकरणे येत आहेत.

देशात अवघ्या 13 दिवसांच्या आत कोविड-19 ची प्रकरणे 30 लाखांवरून वाढून 40 लाखांचा आकडा पार केला आहे, ज्यामध्ये शनिवारी समोर आलेले 86,432 नवे रूग्ण देखील समाविष्ट आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शनिवारी सकाळी आठ वाजताच्या अकाड्यांनुसार, देशात कोविड-19 ची आतापर्यंत एकुण 40,23,179 प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार मागील 24 तासात 1,089 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, यामुळे आता देशात एकुण मृत्यूंची संख्या 69,561 झाली आहे.

महाराष्ट्रात 26 ऑगस्टपर्यंत 7,03,823 प्रकरणे होती, ज्यापैकी 72.03% शहरी भागातून आलेली होती. राज्याच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली.

त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात 26 ऑगस्टपर्यंत 7,03,823 प्रकरणे होती, ज्यापैकी 5,07,022 (72.03 टक्के) शहरी भागातील होती. अशाप्रकारे, 22,794 मृत्यूंमध्ये 76.43 टक्के मृत्यू शहरी भागात झाले होते. परंतु, आता चित्र बदलत आहे. मोठ्या संख्येने लोक गावाकडे गेल्याने सुद्धा तेथे संसर्ग मोठ्याप्रमाणात पसरत आहे आणि आता मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत.