राज्यमंत्री शिवतारे यांच्या प्रयत्नातून नीरा गावाची विकासाकडे वाटचाल

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – ( मोहंम्मदगौस आतार) नीरा ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून नीरा येथील वार्ड नं.३ मधील विठ्ठल मंदिरालगत पाच लाख रुपये खर्च करून उभारलेल्या आर.ओ.प्लांटचे उद्घाटन व शिवतक्रार येथे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेतून ४५ लाख रुपये खर्चाच्या सामाजिक सभाग्रहाचे भूमिपूजनासह विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी (दि.१९) जि.प.सदस्या शालिनी पवार, पं.स.सदस्य प्रा.डॉ. गोरखनाथ माने, सरपंच दिव्या पवार, जि.प.चे माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, गणपत लकडे, संगिता पवार, विजय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लक्ष्मणराव चव्हाण, शिवाजी पवार, वसंतलाल गांधी, मदनराव चव्हाण, हरिभाऊ जेधे, दयानंद चव्हाण, प्रकाश शिंदे, दत्तात्रय भुजबळ, अड. आदेश गिरमे, हाजी रज्जाकभाई बागवान,संजय भंडारी, जितेंद्र जठार, सुभाष पवार, मिलिंद केंडे,भाऊसाहेब धायगुडे, धर्मेंद्र येवले , वर्धमान शहा, अ.रहीम बागवान यांच्या सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण म्हणाले कि, नीरा – शिवतक्रार ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून वार्ड नं.३ मध्ये विठ्ठल मंदिरा शेजारी आर.ओ.प्लांट बसविणे – ५ लाख रुपये, पाटोळे वस्ती मध्ये समाज मंदिर – ८ लाख, वार्ड नं.२ मध्ये प्रल्हाद भंडारी घर ते मस्जिद रस्ता ७ लाख ५० हजार, ग्रामपंचायतीच्या दलित वस्ती सुधार योजनेतून वार्ड नं.३ मधील प्रा.आरोग्य केंद्र ते घरकुल रस्ता कॉन्क्रिटीकरण – ५ लाख, प्रा. आरोग्य केंद्र ते अरुण गोरे घर रस्ता – ५ लाख, वार्ड नं. २ मधील मुस्लीम समाजाच्या दफनभूमीपासून ते लोणकर घर सिमेंट रस्ता – ३ लाख, बाजारतळ ते सोसायटी बंदिस्त गटर – ३ लाख , जिल्हा परिषदेच्या २० टक्के निधीतून बाळासो खताळ घर ते शेवाळे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण, मोठ्या गावांना नागरी सुविधा पुरविणे या योजनेतून बाजारतळावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे – १० लाख रुपये, बाजार तळ ते प्राथमिक शाळा पेव्हिंग ब्लॉक व रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे – १० लाख रुपये आदी विकासकामे मंजूर केले असून यातील बहुतांश कामे पूर्ण झालेली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.

राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नीरा गावातील अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी २ कोटी ५९ लाख, २५१५ अंतर्गत निधीतून गावातील अंतर्गत रस्त्यांकरिता ५० लाख, शासनाच्या दलित वस्ती योजनेतून ९५ लाख रुपये व मुस्लीम समाजाच्या उर्दू शाळेच्या बांधकामासाठी १५ लाख रुपये असे ४ कोटी १९ लाख रूपयांची विकास कामे सुरु आहेत . नीरा गावात जवळपास ९० टक्के अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारी व सार्वजनिक शौचालय झाली असल्यामुळे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भरघोस निधी दिल्यामुळे नीरा गावाची विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचेही ग्रा.पं. सदस्य अनिल चव्हाण यांनी सांगितले.

 

You might also like