SBI च्या ATM मधून दररोज काढू शकता 20 हजार रूपये, ‘या’ पध्दतीनं वाचवा ‘ट्रांजेक्शन’ शुल्क, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुम्ही दररोज 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एटीएममधून काढू शकता. यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. ही सुविधा देशभरातील काही निवडक एटीएमवर सध्या उपलब्ध आहे. एसबीआयच्या खातेदारांना बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी रोजची मर्यादा 10 हजार रुपये आहे. परंतू 20,000 रुपये काढण्याची ही सुविधा काही निवडक एटीएमवर उपलब्ध आहे.

आवश्यक आहे योनो अ‍ॅप
खातेदारांच्या मोबाइलमध्ये त्यासाठी योनो अ‍ॅप असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे योनो अ‍ॅप आहे ते खातेदार दिवसाला 20 हजार रुपये खात्यातून काढू शकतात. यासाठी कोणतेही वेगळे अधिक शुल्क नाही. योनो अ‍ॅपच्या माध्यमातून खातेदार एटीएममधून एका महिन्यात कितीही वेळा पैसे काढू शकतात. यासाठी डेबिट कार्डची देखील आवश्यकता नाही.

असे डाऊनलोड करा अ‍ॅप
योनो अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या स्टोअरवर देखील उपलब्ध आहे. डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट बँकिंगचे यूजरनेम आणि पासवर्ड टाकून अकाऊंट तयार करावे. अकाऊंट सुरु झाल्यावर ग्राहक 6 अंकी एम पिन बनवू शकतात. यामुळे पुढच्या वेळी लॉनिग करताना तुम्हाला सोपे जाईल.

असे काढा पैसे
SBI च्या या सेवेचे नाव योनो कॅश आहे. तुम्ही एटीएम कार्ड शिवाय एटीएम मधून पैसे काढू शकतात. जर तुम्ही विना एटीएम कार्ड पैसे काढतात तर तुम्हाला योनो अ‍ॅपमध्ये रिक्वेस्ट करावी लागेल. यानंतर मोबाइलवर एक मेसेज येईल ज्यात एक 6 अंकी पिन असेल.

60 हजार एटीएमवर मिळते ही सुविधा
भारतीय स्टेट बँकचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले की सध्या देशात स्टेट बँकचे 60 हजार एटीएम आहेत. यातील 28 हजार एटीएमला योनो अ‍ॅपला जोडले आहेत. लवकर 60 हजार कस्टमर पाॅइंटवर ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल.

Visit : Policenama.com