Coronavirus : ‘कोरोना’मुळं ‘अ‍ॅडव्हॉन्स’मध्ये काढू शकता PF अकाऊंटमधून पैसे, जाणून घ्या संपुर्ण ‘प्रक्रिया’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कामगार मंत्रालयाने सहा कोटी ईपीएफ सदस्यांना पीएफ खात्यातून तीन महिन्यांचा मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याबरोबर समान रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. कोविड -१९ विरूद्ध लढा देण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ मध्ये दुरुस्ती करुन मंत्रालयाने २८ मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा निर्णय जाहीर केला. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी त्यांनी आणखीही अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कर्मचारी त्यांचे तीन महिन्यांचा मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता किंवा त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम काढून घेऊ शकतात. लोकांना ही रक्कम त्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्याची आवश्यकता नाही. कोविड -१९ ला साथीचा रोग म्ह्णून घोषित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत देशातील विविध कंपन्या व कारखान्यांचे कर्मचारी या नॉन – रिफंडेबल अड्वान्सचा लाभ घेऊ शकतात. यासाठी १९५२ च्या ईपीएफ योजनेत पॅरा ६८ (L) खाली सब-पॅरा (३) समाविष्ट केला आहे. सुधारित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (दुरुस्ती) योजना २०२० या महिन्याच्या २८ तारखेपासून अंमलात आली आहे.

खटल्यांचा लवकर निकाल करण्याच्या सूचना
या अधिसूचनेनंतर कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्याच्या पैसे काढण्याच्या अर्जावर प्रक्रिया करण्याचे निर्देश आपल्या सर्व क्षेत्र कार्यालयांना दिले आहेत. सद्य परिस्थिती पाहता या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशा प्रकारे काढू शकता पीएफ फंडातील जमा राशी

१. युनिफाइड मेंबर पोर्टलवर लॉग इन करा.

२. UAN नंबर व पासवर्डद्वारे या पोर्टलवर लॉगिन करा.

३. ‘ Manage ‘ टॅबवर जा आणि केवायसीशी संबंधित आपली सर्व माहिती (आधार, पॅन आणि बँक खाते) बरोबर आहे की नाही ते तपासा.

४. केवायसीशी संबंधित माहिती योग्य असल्यास ‘ Online Services ‘ टॅबवर जा आणि ड्रॉप डाऊन मेन्यूमधून ‘ Claim (फॉर्म -११, १९ आणि १०C )’ निवडा.

५. Claim स्क्रीनवर , सभासदांचे तपशील, केवायसी तपशील इ. दिसतील. आपल्या बँक खात्यातील शेवटचे चार अंक प्रविष्ट करुन व्हेरीफाईड करा.

६. त्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यासाठी Yes वर क्लिक करा.

७. मग ” Proceed for Online claim” ” वर क्लिक करा.

८. यानंतर Claim फॉर्ममध्ये कारण निवडा.

९. आता अर्ज सबमिट करा.

१०. त्यानंतर अर्ज फील्ड ऑफिसमध्ये जाईल आणि तिथून प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या खात्यात अ‍ॅडव्हान्स येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like