हरवलेल्या मुलाला काही तासातच बिबवेवाडी पोलिसांनी शोधले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चैत्रबन येथे वडिलांकडून पाच रुपये घेऊन खाऊ खाण्यासाठी घेऊन गेला असता तो अद्याप पर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी आजूबाजूला शोधून मुलगा न मिळाल्याने बेपत्ता झाल्याची खात्री होताच. बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती देताच. पोलिसांनी काही तासाच्या आत बेपत्ता झालेला मुलाला काढले शोधून.

शुक्रवार दिनांक सात जून 2019 रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास आरुष उर्फ रुपेश संतोष गायकवाड(वय 7, राहणार. चैत्रबन,अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी, पुणे) हा मुलगा वडिलांकडून 5 रुपये खाऊ खाण्यासाठी घेऊन गेला असता. तो तो अद्याप पर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी आजूबाजूला शोधून न मिळाल्याने मुलगा बेपत्ता झाल्याची खात्री होताच.

बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती देताच. पोलीस हवालदार जांभळे,पोलीस शिपाई शितोळे, पोलीस शिपाई केंद्रे यांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य घेऊन लागलीच अप्पर परिसरात शोध घेतला असता काही तासाच्या आत मुलगा मिळून आला. त्याला त्याची आई जया संतोष गायकवाड यांच्याकडे सुखरूप ताब्यात देण्यात आले.

You might also like