दोन महिन्यांत शिक्षकांच्या 18 हजार रिक्त जागा भरणार; विनोद तावडे यांची मोठी घोषणा

नागपूर: पोलीसनामा आॅनलाईन

आगामी दोन महिन्यांत शिक्षकांच्या रिक्त असलेल्या 18 हजार जागा भरणार असल्याची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. या जागा आॅनलाईन पद्धतीने भरण्यात येणार असून भरतीसाठी आरक्षणाचे निकष लागू असणार आहेत.
[amazon_link asins=’B079L6LK4K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1cc9ddde-8394-11e8-a655-4b4f5b303dbe’]
यावेळी शिक्षक भरती अधिक पारदर्शक करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचेही विनोद तावडे यांनी सांगितले. या जागा आरक्षणाच्या निकषावर भरण्यात येणार असून यामध्ये खेळाडूंच्या आरक्षणाचाही समावेश असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती बंद आहे. त्यामुळे या शिक्षक भरतीच्या घोषणेमुळे शिक्षक होण्यासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.