धक्‍कादायक ! ‘स्मार्ट’ पुण्यात चक्‍क चारचाकीच्या लाईटच्या उजेडात उरकला ‘अंत्यविधी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब अशी ओळख असलेल्या पुण्यातील वाकड परिसरात एक धक्‍कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडीत झाल्याने चक्‍क चारचाकीच्या लाईट चालु करून अत्यंविधी उरकण्याची वेळ एका कुटूंबावर आली. ही धक्‍कादायक घटना गुरूवारी घडली आहे.

पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जात तर पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्टच्या दिशेने आहे. वाकड परिसर हा उच्चभू्र आणि आयटीतील लोकांचा म्हणून ओळखला जातो. असं असताना देखील वाकड येथील स्मशानभूमीत चक्‍क चारचाकी वाहनांची लाईट चालू ठेऊन अत्यंसंस्कार उरकावले लागले. गुरूवारी रात्री स्मशानभूमीतील विद्युत दिवे बंद होते. सर्वत्र अंधार होता. पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारची घटना घडणं ही अतिशय वाईट गोष्ट असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. परिसरातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. किमान वीज आणि रस्त्याचा प्रश्‍न तरी लोकप्रतिनिधींनी तात्काळ सोडवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.