Coronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल एक लाखापर्यंत जात आहे. तर याद्वारे संशोधकांनी केलेल्या माहितीनुसार काही संकेत दिले आहेत. त्यामध्ये म्हटलं आहे की ज्यावेळी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेलाय मात्र त्याला कळलंच नाही. तर काही लक्षणं लाँग कोविडच्या रूपामध्ये काही महिन्यांपर्यंत टिकून राहू शकतो असे एका डॉक्टरांनी म्हटलं आहे.

यावरून डॉक्टर आणि संशोधकांच्या म्हणण्यानुसार एक मोठी संख्या अशा काही लोकांचीही आहे, ज्यांना कशातरी कारणाने कोरोना झाला, पण, त्यांची चाचणी सकारात्मक आली नाही किंबहुना काही व्यक्तींनी कोरोनाची लक्षणं न दिसल्याने चाचणीच केली नाही. गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या कोरोनाच्या लाटेत जास्त्ततर लोक अशाही लक्षणांचे दिसून येत आहेत. ज्यां व्यक्तींना सर्दी-खोकला आणि तापाव्यतिरिक्त, पोटदुखी, डोकेदुखी, लाल डोळे अशी लक्षणं दिसली. गेल्या वर्षी लक्षण नसणाऱ्या लोकांची संख्या खूप होती. तर यासंदर्भात केवळ ५ लक्षण काय आहेत त्यावरून तुम्ही जाणून घेऊ शकता. ते पहा.

हे आहेत ५ लक्षणे –

१.  अनेकदा व्हायरल संक्रमणमुळे डोळे लाल होतात. पण कोरोना संक्रमण झाल्यास, डोळे लाल होण्यासह, डोकेदुखी आणि ताप ही लक्षणंही दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणं यापूर्वी कधी दिसली असतील, तर ते कोरोनाचे संकेत असू शकतात.

२.  व्यक्तींच्यात अतिशय थकवा येणं हेही कोरोनाचे लक्षण असू शकते. तर कधी ३ ते ४ दिवसांपर्यंत अतिशय थकवा जाणवला असेल, दररोजची कामं करणंही कठिण वाटत असेल किंवा संपूर्ण शरीर दुखत असेल तर हादेखील कोरोनाचा संकेत ठरू शकतो, की व्यक्तीला कोरोना झाला मात्र तो समजलाच नाही.

३.  कोरोना संसर्गामुळे लोकांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होत आहे. त्याव्यतिरिक्त काही लोकांना कन्फूजन, असंतुलन आणि एकाग्र होण्यासाठीही समस्या येत आहेत. या स्थितीला मेडिकल टर्ममध्ये ब्रेन फॉग असं म्हणतात. मागील काही दिवसामध्ये फोकस राहण्यासाठी समस्या आल्या असतील, गोष्टी आठवत नसतील तर अशी काही लक्षणं कोरोनाच्या संसर्गामुळेही असू शकतात.

४.  कोरोना संसर्ग फक्त श्वसनतंत्रालाच नाही, चर पचनसंस्थेवरही परिणाम करत आहे. डॉक्टरांच्या संशोधनानुसार, असे काही लोक आहेत, ज्यांना सर्दी-ताप-खोकला यापैकी काहीच झालं नाही. मात्र त्यांना डायरिया, मळमळ, पोटात गोळा आल्यासारखं होणं, भूक न लागणं अशी लक्षणं दिसली, पण ते निदान करू शकले नाहीत.

५.  श्वास घेण्यास त्रास होणं, ही देखील कोरोना व्हायरसबाबत गंभीर समस्या आहे. श्वास घेण्यास त्रास होण्यासह, छातीत जडपणा किंवा अडकल्यासारखं झालं असेल, तर हेदेखील कोरोना संक्रमणाचे संकेत ठरू शकतात. असे संशोधनावरून खुलासा केला आहे.