शिवस्मारकावरून सरकार शिवरायांचा अपमान करते आहे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सर्व परवानग्या नव्हत्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन कशाला केले असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. स्मारकाचे जलपूजन करून प्रश्न प्रलंबित ठेवणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असे देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शिवस्मारकाचा प्रश्न उपस्थित केला असता त्यावर धनंजय मुंडे यांनी मत व्यक्त केले. शिवस्मारक समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहून स्मारकाचे कंत्राट कशा प्रकारे चुकीचे आहे हे लिहले होते. सभागृहात या संदर्भात खुलासा व्हायला हवा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली आहे.

सरकार परवानग्या घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभा करायचे आहे साधा पुतळा उभा करायचा नाही हे सरकार लक्षात घेत नाही. सरकार शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करू पाहते आहे आणि या बाबत सरकाने आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली नाही असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. दरम्यान सरकार शिवस्मारकावर भूमिका स्पष्ट करत नसल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषदेत गोंधळ घातला. वाढत्या गोंधळामुळे सभापतींनी कामकाज सभागृहाचे कामकाज तहकूब केले.