अपंगत्व आलेल्या साक्षीदाराची व्हिडीओ कॉलद्वारे न्यायालयात साक्ष

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातप्रकरणात कोल्हापूरच्या साक्षीदाराला साक्ष नोंदविण्याची इच्छा हाेती. मात्र अपघातात कमरेखालील भाग बधीर कामच करत नाही. त्यामुळे न्यायालयात त्यांना हजर होता येत नव्हते. मात्र न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करत थेट स्मार्टफोनवरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी त्याची साक्ष घेतली. ही साक्ष शिवाजीनगर न्यायालयात नोंदविण्यात आली. यापुर्वी नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत जर्मनीत असलेल्या एका तक्रारदाराची तक्रार व्हाट्सअॅप कॉलद्वारे मागे घेण्यात आली होती.

न्यायालयासोर साक्ष नोंदवायची तर प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर राहावे लागते. मात्र स्मार्ट झालेल्या न्यायालयांनी आता स्मार्ट तंत्रज्ञानांचा वापर न्यायालयीन कामकाजात केला आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात आता स्मार्ट तंत्रांचा वापर करून काही तांत्रिक अडचणींवर मात करत खटला पुढे जाऊन निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’816b1401-8999-11e8-91fc-1b07046d9966′]

सुभाष यट्टूपा यादव (इब्राहिमपुर, ता. चंदगड जि. कोल्हापूर) असे साक्षीदाराचे नाव आहे. 2016मध्ये सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अपघात झाला होता. या अपघातात सुभाष यादव हे जखमी झाले होते. तेच या प्रकरणात फिर्यादी होते. त्यांच्या कंबरेखालील भाग निकामी झाला होता. या प्रकरणी पुण्यातील लाचलुचपत न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. याप्रकरणात न्यायालयातून त्यांना साक्ष समन्स बजावण्यात आले होते. त्यांची साक्ष देण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या शारीरिक असमर्थतेमुळे ते न्यायालयात हजर राहू शकत नव्हते. याबाबत त्यांनी न्यायालयाला कळवले होते. त्यामुळे सहायक सरकारी अभियोक्ता उज्वला पवार यांनी 13 जूनरोजी न्यायालयाकडे व्हीडीओ कॉन्सफरींगद्वारे त्यांची साक्ष नोंदविण्यासंदर्भात परवानगी मागितली.

न्यायालयाने ती मान्य केली. 16 जूलै रोजी पुढील सुनावणीदरम्यान त्यांची साक्ष नोंदविण्यात येणार होती. यासंदर्भात सिंहगड रोड पोलिसांना कळविण्यात आले. सिंहगड रोड पोलिसांनी चंदगड पोलिसांशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला. चंदगड पोलिसांना त्यांचा एक कर्मचारी स्मार्टफोनसह यादव यांच्या घरी पाठवून तेथून व्हिडीओ कॉन्सफरंसिंगद्वारे साक्ष नोंदविण्यास सहकार्य करावे असे कळविण्यात आले. त्यानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांची साक्ष नोंदविण्यात आली.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’863323b3-8999-11e8-ae78-b3d87cca1e3c’]

या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शशीकांत जगदाळे, किरण देशमुख, राजू राजपुत यांनी तर चंदगड पोलिस ठाण्यातून पोलिस निरीक्षक एस. एम. यादव पोलिस कॉन्सटेबल ए. आर. निकम, एस. एम वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.