‘या’ मुलानं ‘NASA’ मध्ये ‘इंटर्नशिप’च्या तिसऱ्याच दिवशी शोधून काढलं ‘नवीन जग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणतेही मोठे काम करण्यासाठी वयाला कोणतीही अट नसते. वय कमी असो की जास्त आपण कधीही आश्चर्यकारक आणि काही मोठे काम करू शकतो. याचेच उदाहरण आहे वोल्फ ककियर. हा एक १७ वर्षीय मुलगा आहे, ज्याने २०१९ मध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वोल्फ हा अमेरिकेचा रहिवासी असून ज्या वयात मुलं व्हिडीओ गेम्समध्ये गुंतलेली असतात त्या वयात वोल्फने अवकाशात दुसऱ्या जगाचा शोध लावला आहे. वोल्फ हा नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटर मध्ये इंटर्नशिप करत होता आणि इन्टर्नशिपच्या तिसऱ्या दिवशीच या मुलाने कमाल करून दाखविली आहे. जाणून घेऊया वोल्फच्या शोधाबाबत…

वोल्फ ककियर ने २०१९ मध्ये न्यूयार्क च्या स्कारडेल स्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इंटर्नशिप करण्यासाठी मेरीलँड च्या ग्रीनबेल्ट येथील गोगार्ड स्पेस फ्लाईट सेंटर येथे इंटर्नशिपला सुरुवात केली. इंटर्नशिपमध्ये वोल्फचा विषय होता तारे आणि ग्रहातून निघणार्‍या प्रकाशाचा अभ्यास करणे.

वोल्फने गोगार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये नासाच्या ट्रांझीटिंग एक्झोप्लानेट सर्व्हे सॅटेलाईट (TESS) च्या मदतीने आपल्या विषयावर काम सुरू केले. वोल्फ म्हणाला की तो ग्रहांच्या प्रकाशासोबतच दोन ग्रह असणाऱ्या जगाचा शोध देखील घेत आहे. मला येथे इंटर्नशिप करायला तीन दिवसच झाले होते की मला TOI १३८८ सिस्टिमकडून एक सिग्नल मिळाला.

वोल्फ ककियर याने सांगितले की प्रथम मला वाटले की हे एखादे अंतरिक्ष ग्रहण असेल. पण त्याची वेळ चुकीची आहे. जेव्हा मी तपास केला आणि आकड्यांना मिळवले तर आढळून आले की तो एक ग्रह आहे. TOI १३८८ ही एक बायनरी स्टार सिस्टिम आहे.

TOI १३८८ पृथ्वीपासून सुमारे १३०० प्रकाश वर्षे दूर असलेल्या पिक्टर नक्षत्रात आहे. TOI १३८८बी हा ग्रह पृथ्वीपेक्षा ६.९ पट मोठा आहे. तो आपल्या सूर्याच्या अगदी जवळ आहे. वोल्फने सांगितले की सुरुवातीला मला हा एक तारांचा समूह वाटला. हे सिद्ध करण्यासाठी मला त्याची काही काळ तपासणी करावी लागली, त्यानंतर कळले की हा एक बोनाफाइड ग्रह आहे.

वोल्फने सांगितले की त्याला अंतरिक्षच्या त्या जागेमध्ये १०० पेक्षा जास्त तेजस्वी वस्तू दिसल्या. वोल्फने सर्व चमकदार वस्तूंवर काम केले. मग त्याला निदर्शनास आले की तिथे एक ग्रह देखील आहे. TOI १३८८ आपल्या सूर्यापेक्षा सुमारे १० पटीने मोठा आहे.

TOI १३८८ बी ग्रह आपल्या सूर्याभोवती दर १५ दिवसांनी एक चक्कर मारत असतो. TOI 1388 बी आपल्या एक तृतीयांश पेक्षा जास्त थंड आहे. हा ग्रह आपल्या सौर यंत्रणेच्या नेपच्यून आणि शनी ग्रहाच्या मधल्या आकाराएवढा आहे.

वोल्फ ने गोगार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील वैज्ञानिकांच्या सहकार्याने या शोधावरील लेखदेखील प्रकाशित केला आहे. ६ जानेवारी रोजी आयोजित २३५ वी अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमिकल्स सोसायटीच्या बैठकीत हा लेख दाखविण्यात आला. या व्यतिरिक्त हा लेख साइंटिफिक जर्नल मध्येही प्रकाशित केला जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –