28 वर्षाच्या ‘या’ युवतीचे आत्तापर्यंत 130 पुरूषांशी ‘शारीरिक’ संबंध, ‘ही’ हेल्थ कंडिशन कारणीभूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका २८ वर्षीय महिलेने मुलाखतीत सांगितले की, तिने आजपर्यंत तब्बल १३० पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. इतक्या जास्त लोकांसोबत संबंध ठेवल्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नुकसान देखील झाले आहे.

ब्रिटनमधील रहिवासी फ्रॅन्की कोन्सिडिन म्हणाली की तिचा मेंदू तेव्हाच काम करतो जेव्हा तिला माहित असते की ती आज कोणाबरोबर झोपणार आहे. वास्तविक पाहता फ्रॅन्की ही एका आरोग्याच्या स्थितीला सामोरे जात आहे.

खरं तर लैंगिक व्यसनात पुरुषांनाच जोडले जाते. परंतु या व्यसनाच्या शिकार महिला देखील झाल्या आहेत. डॉक्टरांनी लैंगिक व्यसनाला मेंटल हेल्थ डिस्ऑर्डर म्हणून मान्यता दिली आहे.

फ्रॅन्की देखील लैंगिक व्यसनाला सामोरे जात आहे. तसेच टायगर वुड्स, रसेल रसेल ब्रँड सारखे सेलिब्रिटी देखील लैंगिक व्यसनामुळे परेशान झाले आहेत. ब्रिटनमध्ये एका अंदाजानुसार सुमारे ६ लाख ६० हजार महिला लैंगिक व्यसनाच्या आहारी गेल्या असून या परिस्थितीचा सामना करत आहेत.

लैंगिक व्यसन असणाऱ्या लोकांमध्ये इतर काही समस्या देखील असू शकतात. फ्रॅन्की या व्यसनामुळे नैराश्य आणि अनेक एसटीआयची देखील शिकार झाली आहे. ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टच्या म्हणण्यानुसार देशातील ४ टक्के लोक लैंगिक व्यसनाने त्रस्त आहेत. त्यापैकी एक चतुर्थांश महिला आहेत. लैगिक व्यसन हे कोणत्या कारणामुळे जडते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फ्रॅन्कीचे असे मानणे आहे की तिच्या पालकांचा जो दु:खद घटस्फोट झाला होता हे त्यामागील कारण असू शकते. फ्रॅन्की केवळ १३ वर्षाची असतानाच तिच्या पालकांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर कॅन्सरमुळे आईचे निधन देखील झाले.

You might also like