महिलेचा डॉक्टरवर बलात्काराचा आरोप, व्हिडिओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका महिलेने जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरसह, पुरुष नर्स आणि इतर लोकांवर सामुहिक बलात्काराचा आरोप लावला आहे. तसेच जिवंत मारण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप लावण्यात आला. या महिलेचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या महिलेने आरोप केला की तिने या संबंधित तक्रार पोलिसात दिली परंतू त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.

व्हायरल व्हिडिओनुसार पीडित महिला सेक्टर – 31 च्या निठारी गावात राहते, तिच्या पतीची जुलै महिन्यात अचानक तब्येत खराब झाली. तिने पतीला रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान तिची भेट पुरुष स्टाफ नर्सशी झाली. यानंतर दोघात मैत्री झाली.

आरोप लावण्यात आला आहे की मैत्रीचा फायदा घेऊन या तरुणाने एका डॉक्टराच्या आणि इतर काही जणांच्या मदतीने त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या आरोपानुसार तिने पोलिसात तक्रार दाखल केली. परंतू कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर महिलेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

Visit : Policenama.com