RSS स्वयंसेवकानं घरात घुसून केला बलात्कार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा दावा, महिलेच्या आरोपानं खळबळ

पोलीसनामा ऑनलाईन – एका महिलेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर (RSS) बलात्काराचा आरोप केला आहे. घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत स्वयंसेवकाने बलात्कार केल्याचा दावा या महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातील फिरोझाबादमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी संबधित महिलने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घरी एक स्थानिक आरएसएस स्वयंसेवक अधूनमधून येत असत. एक दिवस त्याने फिर्यादी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने विरोध करत त्याला घरातून हाकलून दिले. तसेच पुन्हा इकडे फिरकायचे नाही, असा इशारा दिला. मात्र काही दिवसानंतर ती व्यक्ती त्या महिलेच्या घरात घूसला. फिर्यादी महिलेसोबत जबरदस्ती करू लागला अन् तिच्या डोक्याला बंदूक लावून आरोपीने बलात्कार केला. अत्याचार करताना महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या बहिणीचा पती आवाज ऐकून धावत आला. यावेळी आरोपीने आपण आरएसएस स्वयंसेवक असून, आपल कुणीच काही करू शकत नाही, असे म्हणत तेथून निघून गेला असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रमुख रामचंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितले की, महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यानुसार तपास सुरू आहे. जर तक्रारीत तथ्य आढळून आल्यास आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल. ती व्यक्ती जर दोषी असेल, तर मग ती आरएसएस स्वयंसेवक असो अन्य कुणी कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही,असे ते म्हणाले.