‘बंधक’ बनवुन २ बहिणींवर बलात्कार, वडिलांच्या विरूध्द ‘धक्‍कादायक’ खुलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील धौलपुरमध्ये एक चकित करणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांवर आरोप करताना म्हटले कि, वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्याने त्यांनी छोटी बहीण आणि माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. या मुलीने पोलिसांना सांगितले कि, आपल्या पतीला खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवण्यासाठी वडिलांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुलीने आपल्या मर्जीने लग्न केल्याचा आणि आपल्या वडिलांविरुद्ध बोलल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ या मुलीचा असल्याचे आता स्पष्ट झाला आहे. यावेळी तिने पोलिसांना अधिक माहिती देताना सांगितले कि, वडिलांनी आम्हा दोघी बहिणींचे अपहरण झाल्याचा आणि बलात्कार झाल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा लागला होता.

आपल्या मर्जीने लग्न करणाऱ्या या १९ वर्षीय तरुणीने पोलीस उपअधीक्षक वासुदेव सिंह यांना सांगितले कि, वडील नेहमी आम्हाला मारत असत. त्याचबरोबर माझा पती नरेश गुर्जर यांच्याविरोधात देखील खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मी मागील दोन वर्षांपासून त्याच्या संपर्कात असून मी त्याच्याबरोबर आंनदात जीवन घालवत आहे. २८ डिसेंबर २०१८ रोजी मी त्याच्याबरोबर कोर्टात लग्न केले आहे. त्यानंतर ३० एप्रिल २०१९ मध्ये तिने महिला सुरक्षा केंद्राकडे मदत मागितली होती. यावेळी तिने म्हटले होते कि, वडील माझ्या पतीशी मला बोलू देत नाहीत तसेच मारहाण देखील करत होते.

दरम्यान, नरेश आणि मी वेगवेगळ्या जातीचे असल्याने घरचे मला आणि माझ्या पतीला त्रास देत असल्याचे देखील तिने म्हटले आहे. त्याचबरोबर सुरक्षेची देखील तिने मागणी केली आहे. माझ्या पतीला तुरुंगात टाकण्यासाठी अट्रोसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस आता तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची आणि मुलीच्या मॅरेज सर्टिफिकेटची तपासणी करत आहेत.

 

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

Loading...
You might also like