धक्कादायक ! राजधानी एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणाऱ्याकडून महिलेची छेडछाड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली – रांची राजधानी एक्सप्रेसमध्ये टीसी आणि पेंट्री कर्मचाऱ्यांनी छेडछाड करून गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यानंतर रेल्वे प्रशासनाने घटेनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिलेच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री ट्विट करून घटनेची माहिती दिली असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थ दिल्याचा आरोप केला आहे.

महिलेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, पेंट्री कर्मचारी आणि टीसी यांनी मिळून रेल्वेमध्ये मुलीसोबत गैरवर्तन करून तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तिला आईस्क्रीममधून गुंगीचे औषध देण्यात आले. तसेच रेल्वे प्रशानाकडून आरोपींवर कोणतीच कारवाई झाली नाही तर ते मोकाट फिरून अन्य प्रवाशांना त्रास देतील. त्यामुळे रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का ? असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केला आहे. पुढे लिहले आहे की, पीडित मुलगी एक विद्यार्थी आहे आणि कायदेशीर कचाट्यात अडकल्यानंतर ती सामान्य जीवन जगू शकणार नाही अशी भीती तिला आहे.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की महिलेने या घटनेची फिर्याद दिली आहे. महिलेने केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देताना आयआरटीसी पूर्व झोनने म्हटले आहे की, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. सर्व आवश्यक पावले उचलली जात असून तपास सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याअंतर्गत आवश्यक कार्यवाही केली जाईल. रांची विभागाने चौकशीचे आदेश देऊन संबंधीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –