इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून ‘त्या’ महिला अँकरचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीतील नोएडा सेक्टर ७७ येथे एका स्थानिक वाहिनीच्या महिला अँकर चा  इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. ही महिला अँकर नोएडा सेक्टर ७७ मधील अंतरिक्ष अपार्टमेंट मध्ये रहात होती. पोलिसांनी तिच्या सहकारी अँकरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती आहि की, नोएडा सेक्टर ४९ च्या एसएचओने दिलेल्या माहितीनुसार ही महिला अँकर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेनंतर ताबडतोब तिच्या सहकारी महिला अँकरने तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित फ्लॅटची तपासणी केली. यावेळी तेथून एक दारूची बाटली जप्त करण्यात आली. तसेच, घटना घडली तेव्हा आपण बाथरूमला गेलो होतो, त्यामुळे आपल्याला यासंदर्भात काहीही माहित नाही, असे मृत अँकरच्या सहकाऱ्याने म्हटले आहे.
 संबंधित अँकर नोएडा सेक्टर ७७ च्या अंतरिक्ष अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. ४०२ मध्ये राहात होती. संबंधित महिलेच्या फ्लॅटवर पर्टीचे वातावरण होते. पोलिसांनी तिच्या घरच्यांना माहिती दिली आहे. ते येथे आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अँकरचा मृतदेह सेक्टर ९४ च्या शवागारात पाठविण्यात आला आहे.