धक्कादायक ! बस स्थानकावरून 8 महिन्यांच्या बाळाचं अपहरण (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुरादाबादमध्ये एक 8 महिन्याच्या लहान बाळाची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बस स्थानकात हि घटना घडली असून पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील हाती लागले आहे. एका महिलेने आणि पुरुषाने या महिलेचे मूल पळवल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी या मुलाच्या आईने तक्रार दाखल केली असून आरोपींची देखील ओळख पटली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पतीबरोबर झालेल्या वादानंतर हि महिला आपल्या लहान मुलासह बस स्थानकावर आपला उदरनिर्वाह करत होती. मात्र याच दरम्यान तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या एका महिलेने आणि पुरुषाने या महिलेशी ओळख वाढवत आणि तिचा विश्वास संपादन करत तिच्या बाळाला पाणी पाजण्यासाठी हातात घेतलं आणि निघून गेले.

मात्र खूपवेळा ते परत न आल्याने महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी शोध घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी पुरुष आणि महिला फुटेजमध्ये आढळून आले. दरम्यान पोलिसांनी ता प्रकरणी महिला आणि पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

Visit : Policenama.com