विधवा 32 वर्षीय ‘मारिया’चं 27 वर्षीय ‘हरबक’सोबत होतं ‘लफडं’, सासरा बथवेल अन् दीर विकासनं केलं असं काही…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील चपळगावात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन विधवा सुनेची व तिच्या प्रियकराची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचे सासरे व दिराला अटक केली आहे.

मारिया लालझरे आणि हरबक भागवत अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बथवेल लालझरे (सासरे) आणि विकास लालझरे (दिर) अशी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारियाच्या (३२) पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिचे गावातील हरबक भागवतसोबत (२७) प्रेमसंबंध होते. तो सुद्धा विवाहित होता. त्यांच्या या प्रेमसंबंधाला मारियाच्या सासरच्यांकडून विरोध होता. मारियापासून लांब राहा नाहीतर याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकीही त्यांनी हरबकला दिली होती. त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत हरबकने मारियाच्या सासरे व दिराविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

३० मार्च रोजी हरबक आणि मारिया गुजरातला पळून गेले होते. त्यानंतर मारियाच्या कुटूंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या दोघांना गुजरामधून २२ एप्रिलला परत आणले. व नंतर ते दोघे गावात एकत्र राहू लागले. २८ ऑक्टोबरला मारिया आणि हरबक दुचाकीवरुन जात असताना, ट्रॅक्टर वरुन जात असलेल्या विकास लालझरने त्यांना चाकाखाली चिरडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हरबकच्या पत्नीने विकास लालझरे आणि त्याच्या वडिलांनीच माझ्या पतीचा आणि मारियाचा खून केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करुन, त्या दोघांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.