भाजपाविरोधी घोषणाबाजी तरुणीला पडली महागात 

चेन्नई  :  वृत्तसंस्था 
भाजपाविरोधी घोषणाबाजी केल्याने एका २२ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली असून तिला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चेन्नई ते टुटीकोरिन दरम्यान विमान प्रवास करत असताना तरुणीने भाजपाविरोधी घोषणाबाजी केली.

सोमवार ३ सप्टेंबरला ही घटना घडली. दरम्यान ही तरुणी ज्या विमानाने प्रवास करत होती त्याच विमानात भाजपा प्रदेशाध्यक्ष तमिलीसाई सुंदरराजन होते. तमिलीसाई सुंदरराजन यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित विमान कंपनीकडे तक्रार केली आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी एक देश, एक कार्ड

टुटीकोरिन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मुरली यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर तरुणीला न्यायालयात हजर केलं असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तिरुनेवेली येथील महिलांच्या विशेष कारागृहात तरुणीची रवानगी करण्याचा आदेश देण्यात आला. मात्र तरुणीने पोटात दुखू लागल्याची तक्रार केल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सीआरपीएफच्या कारवाईत ५०० माओवादी समर्थक ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच नाव सोफिया असून ती  कॅनडात शिक्षण घेत आहे . ती  सुट्ट्यांसाठी टुटीकोरिन येथे आली होती.
[amazon_link asins=’B00DRLASZ6,B01LZPUP1O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’115f13f6-b017-11e8-8860-019245a9e20e’]