2 लोक फक्त उभं राहून पाहत राहिले, तिसर्‍यानं पार्कमध्येच केला महिलेवर बलात्कार

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – एका पार्कमध्ये दोन जण उभे राहून फक्त पाहत होते तर तिसऱ्या नराधमाने पार्कमध्येच महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमधील मँचेस्टरमध्ये घडलेली ही घटना आहे. मेसनेस पार्कमध्ये 16 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीनही व्यक्तींना याबाबत पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे वय तीस वर्षापेक्षा अधिक आहे. रात्री 9.20 च्या आसपास महिला पार्कमध्ये चालण्यासाठी आलेली होती. दरम्यान तिने तीन लोकांशी बातचीत केली आणि अनेक वेळ महिला त्या तीनही पुरुषांसोबत पार्कमध्ये फिरत होती. यावेळी त्यातील एकाने महिलेवर बलात्कार केला आणि इतर दोघांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय 24, 25 आणि 33 इतके आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना याबाबतची अधिक माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Visit : Policenama.com