धक्कादायक ! महिला अ‍ॅथलिटचे अपहरण, विवस्त्र करून डांबून ठेऊन बेदम मारहाण

बर्लिन : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाची अ‍ॅथलिट सायकल खेळाडू नॅथली बिर्ली (वय-२७) हिचे एकाने अपहरण करून तिला विवस्त्र करून मारहाण केली. मात्र, तिने प्रसंगावधान ओळखून अपहरणकर्त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अपहरणकर्त्याला बुधवारी अटक केली. हा प्रकार नॅथली बिर्ली सायकल चालवण्याचा सराव करत असताना मंगळवारी घडला होता.

नॅथली बिर्ली मंगळवारी दुपारी दक्षिण ऑस्ट्रियामधील कुंबर्ग येथे रस्त्यावरुन सायकल चालवण्याचा सराव करत होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका कारने तिला धडक दिली. कार चालकाने तिचे अपहरण करून शहरापासून दूर अंतरावर असलेल्या एका घरामध्ये तिला बांधून ठेवले. अपहरण करणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीने बिर्ली हिचे अंगावरचे कपडे काढून तिला विवस्त्र करत बेदम मारहाण केली. तसेच तिला बळजबरीने दारू पाजली.

अपघातामध्ये नॅथलीचा डावा हाथ दुखावला असून तिच्या डोक्यावर देखील जखमा झाल्या आहेत. या अपघाताविषयी सांगताना नॅथली म्हणाली, नेहमी प्रमाणे घराजवळ सायकल चालवण्याचा सराव करत होते. त्यावेळी तिच्या सायकलला एका कारची धडक बसली. ज्यावेळी शुद्धीवर आले त्यावेळी मला एका ठिकाणी बांधून ठेवण्यात आले होते. तसेच माझ्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकण्यात आले होते. शुद्धीवर आले त्यावेळी एका व्यक्तीने लाकडी पट्टीने बेदम मारहाण केली.

अपहरण करणाऱ्या व्यक्तीकडे खूप दया याचना केली. मात्र, त्याला काही फरक पडला नाही. उलट त्याने अधिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने मला गळा आवळून जीवे मारण्याची धमकी दिली. अपहरण करणाऱ्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून बळजबरीने दारु पाजली. इतकेच नाही तर त्याने एका पाण्याच्या टबमध्ये ढकलून दिले. जेणे करून पाण्यात बुडून माझा मृत्यू होईल. घाबरलेल्या अवस्थेत त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. नॅथलीने अपहरण करणाऱ्या व्यक्तीला विश्वास दिला की, जर त्याने आपल्याला सोडून दिले तर पोलिसांना आपले अपहरण झाले नसल्याचे सांगून अपघात झाला असल्याचे सांगेन. आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने सोडून दिले.

दरम्यान, नॅथलीचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलीस तिच्या सायकलला लावण्यात आलेल्या जीपीएस प्रणालीमुळे तिच्यापर्यंत पोहचले. जीपीएसमुळे नॅथली कोठे आहे याचा शोध घेऊन पोलीस तिला ज्या घरामध्ये बांधून ठेवले आहे त्या घरापर्य़ंत पोहचले. या ठिकाणी पोहचल्यावर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

अपहरण करणारा व्यक्ती माळी काम करतो. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला प्रेमात धोका दिला आहे. त्यामुळे त्याला दारुचे व्यसन लागले आहे. असल्याचे नॅथलीने सांगितले. सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण झाल्यानंतर मध्यरात्री तिची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर नॅथलीने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या अपहरणानंतर मला शोधण्यासाठी झटलेल्या सर्वांचे आभार मानते. माझ्या बाबतीत एका भयानक चित्रपटासारखे घडले. मला अशा ठिकाणी बांधून ठेवण्यात आले होते, ज्या ठिकाणी कोणी पोहचू शकणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like