महिलेने केले पुरुषावर कुऱ्हाडीने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

शेजारी राहत असलेल्या महिलेने पुरुषाच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पिंपरी, विठ्ठलनगर येथे घडला.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ee8d8cd-af9e-11e8-bb34-554814aa71c3′]

प्रविण भागवंत (३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याच्यावर हल्ला झाला असून त्याच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सविता जाधव हिने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

जाहिरात

प्रविण आणि सविता हे दोघे शेजारी राहत आहेत. त्यांच्यामध्ये बराच दिवसांपासून वाद विवाद सुरू होता. यातून अनेकदा त्यांच्यात कडाक्याची भांडणे झाली आहेत. दोन दिवसांपूर्वीही किरकोळ कारणावरून त्या दोघांच्यात वाद झाला होता. आज सायंकाळी सविता ही विठ्ठलनगर येथे राहत असलेल्या तिच्या आईच्या घरी आली होती. त्यावेळी प्रविण हाही तेथे आला. या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून चिडून सविता हिने घरातील कुऱ्हाडीने प्रवीणच्या अंगावर घाव घातले. प्रविणच्या मानेवर वार करण्यात आले आहेत. जखमी अवस्थेत असलेल्या प्रविण याला शेजाऱ्यांनी उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

जाहिरात