मंत्रालयात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, 6 व्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई पोलीसनामा ऑनलाइन- मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका तरूणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली. मंत्रालयातील संरक्षक जाळीमुळे ही तरुणीचा जीव वाचला आहे. ही घटना आज दुपारी घडली.


ही तरुणी आज दुपारी कामानिमित्त मंत्रालयात आली होती. मात्र, अचानक तीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. तरुणीने उडी मारल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या तरुणीचे नाव अद्याप समजू शकले नसून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे देखील समजू शकले नाही.
ही घटना घडल्यानंतर मंत्रालयातील सर्व कार्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.


तरुणी संरक्षक जाळीवर विव्हळत असताना मंत्रालयातील कर्मचऱ्यांनी बघ्याची भूमिका निभावली तर काही लोक व्हिडीओ काढत होते. पोलिसांनी तरुणीला संरक्षक जाळीतून बाहेर काढले. ही तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती, मात्र, ती नेमक्या कोणत्या कारणाने अस्वस्थ होती याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/