मंत्रालयासमोर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कर्जबाजारीपणा, सावकारी अशा अनेक कारणांकरिता शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागील वर्षी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला आहे. यासाठी सुरक्षा म्हणून मंत्रालयात जाळी लावण्यात आली आहे . काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथील एका महिलेने मंत्रालयाच्या गेट समोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना आता आज आणखी एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
[amazon_link asins=’B07BHVY55G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be7f421c-9560-11e8-aa56-d1572f949622′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज मंत्रालयासमोर राधाबाई साळुंखे असे या महिलेने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला . मात्र मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही महिला मूळची बीड येथील रहिवासी आहे. जमिनीचा निकाल या महिलेच्या विरोधात लागल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समजते आहे. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.