…म्हणून ‘तिने’ शेजाऱ्यांना ‘चावा’ घेत केली बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शेजारी राहणाऱ्या महिलेने पतीचा मोबाईल फोन करण्यासाठी घेतला. तो परत मागण्यासाठी महिला गेली तेव्हा मोबाईल परत न करता महिलेने शेजाऱ्यांना मारहाण करत त्यांच्या हाताचे चक्क चावे घेतल्याचा प्रकार काशीमीरा परिसरात घडला.

उषा प्रकाश सोनवणे (वय ५१) यांच्या पतीचा मोबाईल शेजारी राहणार्‍या ललिता विनोद चांदोलकर या महिलेने फोन करण्यासाठी घेतला. त्यानंतर काही वेळाने उषा पतीचा मोबाईल मागण्यासाठी ललिता यांच्याकडे गेल्या. त्यावेळी त्यांनी तो देण्यास नकार दिला. म्हणून उषा यांनी तो हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ललिताने त्यांना धक्का दिला आणि प्रकाश मध्ये पडले तेव्हा त्यांनाही मारहाण केली. उषा यांच्या मनगटांना चावा घेतला. काही वेळाने शेजारी राहणारे प्रकाश आणि वनिता राणे दाम्पत्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वनिता यांनाही मारहाण करून प्रकाश यांच्या हाताचा चावा घेतला. तसेच शेजारच्या छोटेला यादव यांच्याही हाताचा चावा घेतला. त्यानंतर उषा यांच्या नातीला मारहाण करून स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास तुमच्याविरोधात तक्रार देईन अशी धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.