पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला, सर्वत्र प्रचंड खळबळ

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील उंड्री परिसरातील लाईफ पार्क सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एका उच्चशिक्षित महिलेचा मृतदेह आढळून आला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली . महिलेचा संपर्क होत नसल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी फ्लॅट मालकास फोन करून पाहण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पूजा सुधीर शेठ (वय ३४, रा. लाईफ पार्क सोसायटी, उंड्री) असे मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा उंडरीतील फ्लॅटमध्ये २०१६ पासून भाड्याने राहत होत्या. त्यांचे आई-वडील अहमदाबाद येथे राहतात. पूजा यांचे एमबीए पर्यंत शिक्षण झाले असून त्या घरातूनच एका कंपनीसाठी काम करत होत्या. तल एकटे राहण्याची सवय असल्याने पूजा घराबाहेर पडत नव्हत्या. दरम्यान, २६ जानेवारीला पालकांचे पूजा यांच्याशी बोलने झाले होते. त्यानंतर त्यांना फोन लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबातील नागरिकांनी बुधवारी सकाळी फ्लॅट मालकास फोन करून पाहण्यास सांगितले. त्यावेळी घर मालकाला फ्लॅट बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कोंढवा पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला असता पूजा बेडरूमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. कोंढवा पोलिसांनी पूजा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यांच्या अंगावर काहीही खूना नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. फ्लॅटमध्येही काही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाही. याप्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.