बिष्णोई समाजातील महिलेची ‘माणुसकी’ ! हरणाच्या पाडसाला ‘स्तनपान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – असे खूप कमी वेळा घडते माणूस जनावरांप्रती त्याचे प्रेम दाखवत असतो. याबाबतीत बोलायचे झाले तर एक समाज असा आहे ज्याचं प्राण्यांवर जीवापाड प्रेम आहे. जे आपल्या मुलांपेक्षाही प्राण्यांवर जास्त प्रेम करतात. त्यांच्या संरक्षणासाठी धावूनही येतात. बिष्णोई नावाचा हा समाज आहे. एक सध्या समोर आला आहे. जो इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की, बिष्णोई समाजाचे प्राण्यांवर किती प्रेम आहे.

सध्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोत दिसत आहे की, एक महिला हरणाच्या पाडसाला स्तनपान करत आहे. नेटकऱ्यांमध्ये हा फोटो पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे हा फोटो प्रचंड शेअर होताना दिसत आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर परवीन कासवान(Parveen Kaswan)यांनी ट्विट करत हा फोटो शेअर केला आहे. ज्या दिसत आहे की, बिष्णोई समाजातील एक महिला हरणाच्या पाडसाला स्तनपान करत आहे. तिने इतक्या प्रेमाने त्या पाडसाला मांडीवर घेतलं आहे. जसं कोणी आपल्या बाळाला स्त्नपान करताना मांडीवर घेतं. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कासवान यांनी म्हटलं आहे की, “अशा प्रकारे जोधपूरमधील बिश्णोई समाज प्राण्यांवर प्रेम करतो. त्यांच्यासाठी हे प्राणी त्यांच्या मुलांपेक्षा कमी नाहीत. महिला एका पाडसाला स्तनपान करत आहे. याच लोकांनी 1730 मध्ये खेजरी झाडे वाचवण्यासाठी तत्कालीन राजाशी लढा दिला होता.”

सध्या ही ट्विटरवरील पोस्ट सोशलवर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टला काही तासांतच हजारो लोकांनी शेअर केले आहे. अनेकांनी यावर कमेंट केली आहे. तर काहींनी ही पोस्ट लाईक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like