मॅट्रीमोनीयल साईटवर ओळख, महिलेने घातला ४ लाख ८५ हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कौटुंबिक वादातून पत्नी सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर पुनर्विवाहासाठी जीवनसाथी डॉट कॉमवर नोंदणी केली. तेथे एका महिलेशी ओलख झाली. त्यानंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. विश्वास वाढला. परंतु महिलेने इंग्ल़डवरून पार्सल पाठविल्याचे सांगून महिलेने तब्बल ४ लाख ८५ हजार रुपये उकळून फसवणूक केली.

फरासखाना पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५५ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना २१ वर्षांचा एक मुलगा आहे. परंतु तो गतीमंद आहे. कौदुंबिक वादातून पत्नी त्यांना सोडून माहेरी निघून गेली.  पत्नीबरोबर झालेला वाद आणि मुलाच्या संगोपनाचा प्रश्न यामुळे त्यांनी पुर्नविवाह करण्याचा विचार केला. वर्षभरापूर्वी जीवनसाथी डॉट कॉमवर नोंदणी केली होती. एका महिलेशी ओळख झाली. तिने त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

महिलेने विवाहाची इच्छा प्रदर्शित केल्यानंतर तक्रारदाराने तिच्याबरोबर संपर्क साधला. त्यानंतर महिलेने त्यांना इंग्लंडवरून गिफ्ट पाठविल्याची बतावणी केली. त्यासाठी वेळोवेळी त्यांना वसईतील एका बँक खात्यात पैसे भरण्याची सूचना दिली. गेल्या वर्षभरात महिलेने तक्रारदाराकडून ४ लाख ८५ हजार रुपये उकळले. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी तिच्याशी संपर्क साधला. तेव्हा तिचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक या कलमांखाली अज्ञात महिला तसेच बँक खातेदारा विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे यांनी दिली.

Loading...
You might also like